रामजन्मभूमी-बाबरी मशीद निकालाआधी अयोध्या सज्ज

 


अयोध्या वृत्तसंस्था, रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शनिवारी येणार आहे. लोकांनी आपापल्या परीने या निकालानंतरच्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्याची तयारी सुरू केली आहे. काही जणांनी खाण्या-पिण्याच्या वस्तू तसेच घरात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू जमवण्यास सुरूवात केली आहे. काही जणांनी महिला आणि मुलांना सुरक्षित स्थळी पाठवत आहेत. दुसरीकडे, प्रशासन अलर्ट आहे आणि संपूर्ण अयोध्येत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नियोजित लग्नं होताहेत रद्द काही लोक ठरवलेली लग्नं रद्द करत आहेत तर काहींनी लग्नाचे स्थळ बदलून जिल्ह्याबाहेर शिफ्ट केले आहेत. सैयदवाडा येथे मुस्लिमबहुल वस्ती आहे. येथे मंदिर आणि हिंदू कुटुंबांचीदेखील घरे आहेत. या भागातही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.. अयोध्येतील लोकांनी एकमेकांपासून त्रास नाही


सय्यदवाड्यापासून जवळच घनश्याम दास गुप्ता यांचं दुकान आहे. गेले तीन पिढ्यांपासून प्रसिद्ध हनुमान गढी मंदिराबाहेर लाडू विकणाऱ्या गुप्ता यांनी सांगितलं की, 'आम्ही आवश्यक ती तयारी केली आहे. घरात डाळ, तांदूळ वगैरे जमवून ठेवलं आहे.' रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादातील एक पक्षकार उमर फारुख म्हणतात, 'मी सर्व पाहिलं. १९९० ची हिंसा, १९९२ मधील बाबरी मशिद पाडणं, २०१० मधील कोर्टाच्या निर्णयाच्या वेळचा तणाव आणि गेल्या वर्षी शिवसेना अयोध्येत पोहोचली ती घटना. हे सर्व घडूनही लोकांना एकमेकांचा त्रास नाही. त्रास तेव्हा होतो जेव्हा बाहेरून लोक येतात. तो आमच्यासाठी चिंतेचा विषय असतो.' जिल्हा प्रशासनाने विविध समुदायाच्या नेत्यांच्या शांतता बैठका घेतल्या आहेत. व्हॉट्स अॅप ग्रुप बनवले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. आवश्यकता वाटल्यास अतिरिक्त सुरक्षा तैनात केली जाईल.