मुंबई :विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २ आठवडे होऊन गेले आहेत.मात्र अद्याप राज्यात सत्ता स्थापन झालेली नाही शिवसेनेला २.५ वर्षे मुख्यमंत्री पद हवे असून भाजप शिवसेनेची ही मागणी पूर्ण करायला तयार नाही. त्यामुळे अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही.
मात्र आता शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री पड देण्यास भाजप तयार झाले आहे.याबद्दल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली.आज सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांनी भाजप शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले.आम्ही सर्व विषयांवर बोलायला तयार आहे,मात्र शिवसेनेने प्रस्ताव द्यावा,असे पण ते म्हणाले.लवकर सरकार स्थापन करून जनतेचे प्रयत्न सोडवायचा प्रयत्न करू,असेही ते म्हणाले.