अयोध्या निकालानंतर भारतीयांच्या भूमिकेचं कौतुक करतो. 9 नोव्हेंबर हा ऐतिहासिक दिवस आहे


नवी दिल्ली | अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. यात अयोध्यातली वादग्रस्त जागी राम मंदीर बनेल. तर मशीदीसाठी 5 एकर पर्यायी जागा दिली जाईल, असा निर्णय देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं आहे.


कठीण प्रसंगी कायद्याने तोडगा काढता येतो. असाच पेच अयोध्येच्या बाबतीत निर्माण झाला होता. त्यावर न्यायालयाने सर्व समावेशक निकाल दिला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे. आणि या निकालाचं देशाने मनापासून स्वागत करायला हवं, असं मत पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केलं.


अयोध्या निकालामुळे भारताच्या विविधतेतील एकतेचे दर्शन अवघ्या जगाला घडलं. अयोध्या निकालानंतर भारतीयांच्या भूमिकेचं कौतुक करतो. 9 नोव्हेंबर हा ऐतिहासिक दिवस आहे, असंही मोदी म्हणाले.


भारताची लोकशाही मजबूत असल्याचं दिसून आलं. विविधतेच एकतेचा मंत्र उजळून निघाला आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.